हजरत जमाल शाह दर्गा येथे अल्पसंख्यांक मोर्चा कडून तिरंगा अभियान

पनवेल : किरण बाथम 

पनवेलसह संपूर्ण जिल्हा व राज्यातील लाखोंचे श्रद्धास्थान हजरत जमाल शाह दर्गा येथे पत्रकार तसेच भाजप अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांच्याकडून तिरंगा अभियान राबविण्यात आले. 

शुक्रवारी दुपारी नमाज नंतर दर्गा परिसरात सर्वांनी तिरंगी झेंडे फडकावत घोषणा दिल्या. जावेद बाबा शेख यांचे चिरंजीव सिझान शेख यांनी सय्यद अकबर यांचे स्वागत करून अभियानाला शुभेच्छा दिल्या.शुक्रवार असल्याने संपूर्ण वातावरण अध्यात्मिक होते. दुपारच्या प्रार्थनेनंतर सर्वजण देशभक्तीच्या भावनेने सरोबर झाले होते. "मादरे वतन हिंदुस्तान, जिंदाबाद जिंदाबाद" "भारत माता कि जय"अशा विविध घोषणा देत संपूर्ण सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी पुढाकारामुळे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष साजरा होत आहे. देशभरात सर्वसामान्य जनता यामध्ये सहभागी होऊन देशभक्तीच्या मार्गांवर सहभाग दर्शवत आहे. 

अल्पसंख्यांक समाज यामध्ये खुप मोठ्या प्रमाणात भाग घेत आहे. याबाबतीत समाधान वाटते असे मत सय्यद अकबर यांनी व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog