शेडसई ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त समिती अध्यक्ष पदावर चंद्रकांत गायकर यांची निवड
रोहा : समीर बामुगडे
शेडसई ग्रामपंचायतीच्या तंटांमुक्त समितीच्या अध्यक्ष पदावर चंद्रकांत महादेव गायकर यांची निवड करण्यात आली आहे.
शेडसई ग्रामपंचायतीची ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदावर शेडसई गावचे श्री चंद्रकांत महादेव गायकर यांची बिनविरोध सहमतीने निवड करण्यात आली. तसेच ज्ञानेश्वर धर्माजी कोळी याची तंटामुक्ती उपाअध्यक्ष पदी निवड करण्यात आली. या निवडीबद्दल शेड्सई ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ. प्राजक्ता प्रभाकर कडू तसेच सदस्य सौ. राजेश्री राजन पाटील व सौ. कल्याणी कृष्णा मढवी तसेच ग्रामस्थ राजन पाटील, कृष्ण मढवी, दीपक कडू, गोरख कडू, प्रभाकर कडू, ज्ञानेश्वर कडू, राकेश संगम, निलेश कडू यांनी पुष्पगुछ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment