विघ्न येऊ नये म्हणजे भगव्या सुरक्षा पथकाला काम करण्याची संधी मिळणार नाही - किशोर जैन

भगव्या सुरक्षा पथकाच्या उद्घाटन प्रसंगी गणरायाला साकडे

नागोठणे : महेंद्र माने 

नागोठणे येथील वाकण नाका येथे युवासेनेच्या वतीने मंगळवार 30 ऑगस्ट रोजी भगव्या सुरक्षा पथकाच्या उद्घाटन प्रसंगी रायगड शिवसेना सहसंपर्क प्रमुख किशोर जैन यांनी गणेश भक्तांना गणेशोत्सव काळात प्रवास करीत असताना कोणतेही विघ्न येऊ नये; जेणे करून सुरक्षा पथकाला काम करण्याची संधी मिळणार नाही असे साकडे गणरायाला घातले.

या पथकाच्या उद्घाटन प्रसंगी किशोर जैन यांनी संगितले की, सदरील सेवा शिवसेनेच्या माध्यमातून युवासेना गेली पाच वर्षे देत आहे. यामध्ये काम करणारे युवासैनिक हे घरचे गणपति विसरून येथे काम करीत असून या पथकाची पोलिसांनाही मोठी मदत होत असते. मी गणरायला साकडे घालतो की,या गणेशोत्सव काळात आपल्या घरी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांच्या प्रवासात कोणतेही विघ्न येऊ नये; जेणेकरून त्यांचा प्रवास सुखाचा होओ असे सांगून आम्हा सुरक्षा पथकाला काम करण्याची संधी मिळणार नाही असे शेवटी जैन यांनी संगितले. राजेंद्र राऊत यांनी या पथकाला सर्व पदाधिकारी सहकार्य करीत असून रस्त्याच्या आजू बाजूच्या गावकर्‍यांनी रस्त्यात प्रवासा दरम्यान कुठे अपघात किंवा काही अडचण असल्यास शिवसेना व पथकाच्या पदाधिकार्‍यांकडे संपर्क करण्याची विनंती केली.सुधीर ढाणे यांनी नेहमीच आम्ही जनतेला अविरत सेवा देत असतो तशीच कोकणात जाणार्‍या चाकरमानी गणेशभक्तांना अपघात,वाहतूक कोंडी तसेच वैद्यकीय मदतीसाठी भगवं सुरक्षा पथक मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पनवेल ते कोलाड व खोपोली ते पाली नांदगाव पर्यंत 24 तास सेवा देण्यासाठी 100 युवासैनिक तैनात केले असून कुणाला काहीही अडचण आल्यास आमची युवासेना टिम आपल्या पाठीशी उभी असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला शिवसेना उपजिल्हा संघटक राजेंद्र राऊत, महिला उपजिल्हा संघटिका दर्शना जवके,युवासेना रायगड जिल्हा विस्तारक सुधीर ढाणे, युवासेना जिल्हाधिकारी सचिन डोबले,युवासेना जिल्हा चिटणीस चेतन मोकल, युवासेना युवती जिल्हाधिकारी धनवंती दाभाडे,सुधागड ता.संपर्क प्रमुख दिनेश सीतापराव,पं.स.सदस्य संजय भोसले,ऐनघर ग्रा.प. सदस्य किशोर नावले,पो.नि.राजन जगताप,पीएसआय नारायण चव्हाण यांच्यासह दिनेश चिले, राजेंद्र वाळंज,मंदार कोतवाल, संजय कणघरे,राजकुमार पिताणी,शालिनी सिगवण यांच्यासह विभागातील शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते.

Popular posts from this blog