शिहू येथे शेतकऱ्यांसाठी कृषी मार्गदर्शन शिबीर संपन्न

शिहू : मंजुळा म्हात्रे

पीक संरक्षण क्षेत्रात अग्रगण्य कंपनी एफ. एम.सी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तर्फे भात आणि भाजीपाला पीक संरक्षण मार्गदर्शन शिबीर दि.२२ ऑगस्ट रोजी गृप ग्रामपंचायत शिहू येथील कार्यालयात संपन्न झाला.

या वेळी खोड छेदकावर प्रभावी नियंत्रण, निरोगी खोड आणि भक्कम मुळे, अधिक फुटवे सुदृढ पिकांची उत्तम सुरवात, उत्कृष्ट भरलेले दाणे, रोग व किडिंवर नियंत्रण मिळवून दर्जेदार उत्पादन कसे घेता येईल या विषयावर प्रमुख मार्गदर्शक सुधीर गरड यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी प्रगतशील शेतकरी बाळकृष्ण पाटील, महादेव कुथे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या मार्गदर्शन शिबीरासाठी कृषी माई अग्रो सेंटर पोयनाड चे पंकज चवरकर, एफ. एम. सी रायगड जिल्हा प्रमुख सौरभ नाईक, शिवशंभो कृषी केंद्र शिहू चे नयन मोकल, हेमंत मोकल व विभागातील शेतकरी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog