रोहा येथील सार्वजनिक गणेशोत्सवाला १०१ वर्षे पूर्ण 

यावर्षीचा गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जाणार! - राजेश काफरे

रोहा : प्रतिनिधी

रोहा येथील सार्वजनिक सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू असल्याची चर्चा होती, पण यासंदर्भात माजी अध्यक्ष श्री. राजेश काफरे यांनी कार्यालयाशी संपर्क साधून त्यांचे म्हणणे सादर केले आहे. 

त्यांनी आपले म्हणणे सादर करताना स्पष्ट केले की, ट्रस्टच्या विरोधात काही लोकांच्या तक्रारी असून राजकीय स्वार्थासाठी त्यांनी विनाकारण ट्रस्टची बदनामी करण्याचे कारस्थान केलेले असून ट्रस्टबद्दल गैरसमज पसरविण्यात येत आहेत. ट्रस्ट चे ऑडीट झालेले नाही, कोरोनामुळे ऑडीटचे काम थांबले होते; परंतु काही दिवसांतच ऑडीटचे काम पूर्ण केले जाणार आहे व इथे आर्थिक गैरव्यवहार झालेला नाही, असे राजेश काफरे यांनी स्पष्टपणे सांगितले.

या गणेशोत्सव मंडळातर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. तसेच ट्रस्टमार्फत अनेक नागरिकांनी सुविधांचा लाभ देखील घेतलेला आहे. ट्रस्टच्या कार्यांबाबत नागरिकांकडून ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक देखील करण्यात आलेले आहे. तसेच ट्रस्टमध्ये नवीन नियुक्त झीलेल्या पदाधिकाऱ्यांकडून चांगल्या प्रकारे सामाजिक कार्य घडावे याबाबत आमच्या शुभेच्छा नेहमीच आहेत, असे ट्रस्टचे माजी अध्यक्ष श्री. राजेश काफरे यांनी आपले म्हणणे मांडताना स्पष्ट केलेले आहे.

Popular posts from this blog