पिगोंडे तंटामुक्त समिती अध्यक्षपदी दामोदर बावकर यांची बिनविरोध निवड

नागोठणे : महेंद्र माने 

रोहा तालुक्यातील पिगोंडे ग्रा.पं.चे माजी सदस्य तसेच कोळी समाज नेते दामोदर बावकर यांची पिगोंडे तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. 

ग्रा.पं. कार्यालयाच्या सभागृहात सोमवार 29 ऑगस्ट रोजी सरपंच संतोष कोळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत ग्रा.पं.चे माजी सदस्य दामोदर बावकर यांची   पिगोंडे तंटामुक्त अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी उपसरपंच कांचन माळी, माजी उपसरपंच सखाराम घासे, ग्रा.पं.सदस्य शैलेश शेलार,ग्रा.पं.सदस्या कुसुम बावकर व गीतांजली पाटील,माजी उपसरपंच राजेंद्र लवटे, माजी तंटामुक्त अध्यक्षबळीराम बडे यांच्यासह तसेच अंकुश ताडकर, संतोष बडे, काळूराम माळी, काळूराम बडे, रोहन बावकर, प्रशांत बडे, जनार्दन पाटील, पोलीस हवालदार गायकवाड तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog