पालेखुर्द गावाच्या वतीने केद्रीय मंत्री ना. प्रल्हादसिंह पटेल यांचे जंगी स्वागत

रोहा : प्रतिनिधी 

रायगड दौऱ्यावर असलेले केंद्रीय मंत्री ना. प्रल्हादसिंह पटेल यांचा पेण विधानसभा मधील रोहा तालुक्यात नियोजित दौरा होता. दरम्यान, ते पालेखुर्द गावाजवळ आले असता युवानेते महेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पालेखुर्द गावाने मंत्री महोदयांचे जंगी स्वागत केले. 

ना. प्रल्हादसिंह पटेल हे केंद्रीय जलमिशनचे ते मंत्री असल्यामुळे पालेखुर्द गावात जलमिशन योजने अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्याचे पत्र मंत्रीमहोदयांनी ग्रामस्थ व महिला वर्गाला दिले. याप्रसंगी रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पेण विधानसभा संयोजक वैकुंठ पाटील, मा. आमदार विनय नातू, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग, तालुकाध्यक्ष सोपान जांभेकर, मिलींद पाटील आदी उपस्थित होते.  

मंत्री महोदयांनी पालेखुर्द ग्रामस्थांशी संवाद साधला व सर्व ग्रामस्थ आणि महिलावर्गासमवेत सेल्फी घेतली. यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ, महिला व युवक उपस्थित होते. 

Comments

Popular posts from this blog