फाळणी वेदना स्मृतिदिन प्रदर्शनाचे माजी सैनिकाच्या हस्ते उद्घाटन
रोहा : प्रतिनिधी
रोह्यात फाळणी वेदना स्मृतिदिनानिमित्त स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा रोहा तर्फे संघर्ष आणि बलिदानाच्या आठवणींचे प्रदर्शन आयोजित केले आहे.
देशाच्या फाळणीमुळे आपल्या लाखो बंधू-भगिनींना स्थलांतरित व्हावं लागलं आणि काहींना तर आपला जीवही गमवावा लागला. त्या लोकांच्या संघर्ष आणि बलिदानाची आठवण ठेवत फाळणी वेदना स्मृतिदिनानिमित्त आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन कारगिल युद्धात ऑपरेशन विजय मध्ये शौर्य गाजवलेले माजी सैनिक अंकुश साळुंके यांच्या हस्ते झाले. हा दिवस आपल्याला भेदभाव, शत्रूत्व आणि द्वेष संपवण्यासाठी प्रेरणा देणार आहे, यामुळे एकता आणि सामाजिक सद्भावना मजबूत होतील असे शाखा व्यवस्थापक पेडणेकर यांनी सांगितले.
Comments
Post a Comment