राष्ट्रीय महामार्गाची आवस्था 'ना घर का, ना घाट का!

मंजुळा म्हात्रे : प्रतिनिधी

मुंबई - गोवा महामार्गाची परिस्थिती दिवसेंदिवस अति गंभीर झाली असून या बाबत कोणालाही काही देणंघेणं पडलेलं दिसत नाही. गेले दहा ते बारा वर्षे उलटून गेले जवळजवळ एक तप झाले. या राष्ट्रीय महामार्गाचे उघडे घोंगड अद्याप जैसे थे आहे. किती ठेकेदार आले किती गेले तसेच या कालावधीत किती निवडणुका किती आल्या किती गेल्या, कोणी निवडून आले कोणी पराजय झाले. लाखो करोडो रुपये या राष्ट्रीय महामार्गावर खर्च केले जातात त्यात सदरील मार्गाची दुरुस्तीचेच काम अधिक असते त्यामुळे आजतागत किती करोडो खर्च झाले असतील याचा गणित करता येणार नाही. मात्र काम पूर्ण तत्वावर नाही याला जबाबदार कोण असा प्रश्न कायम कोकण प्रवासी वर्गाला पडला आहे. कोकणवासीयांचा गणपती हा मुख्य सण आणि जवळपास कोकणातील सत्तर टक्के लोक हे मुंबईमध्येच कामानिमित्त स्थायिक आहे  गणेशोत्सवाला ते आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्थापनेसाठी आपल्या मूळ गावी कोकणात जात असतात मात्र खड्ड्यांचे ग्रहण ताजे असतानाच आता मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरती एक नवीन  प्रश्न उद्भवला आहे तो म्हणजे स्ट्रक्चर चा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरती पनवेल ते इंदापूर दरम्यान साधारणतः सात ते आठ स्ट्रक्चर ब्रिज उभारणीच्या कामासाठी महामार्ग प्राधिकरणाने उभे केले मात्र हे स्ट्रक्चर गेली सात ते आठ वर्ष अशाच अवस्थेमध्ये पडून आहेत हे स्ट्रक्चर जीर्णावस्थेत झाले असून या स्ट्रक्चर साठी वापरण्यात आलेल्या व लोखंडी शिगा या एकंदरीत रोडवरती बाहेर निघाल्या आहेत त्यामुळे प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या जीवास गंभीर इजा पोहोचण्याची दाट शक्यता आहे. परिणामी गंभीर अपघात होण्याचे देखील दाट शक्यता निर्माण झाली आहे. 

मुंबई-गोवा महामार्गाची पनवेल ते इंदापूर पर्यंत जितके आपण पाहता काही ठिकाणी अर्धवट अवस्थेमध्ये रस्त्याचे काम झालेले आहे व काही ठिकाणी पुन्हा तो रस्ता बोल रस्त्याला मिळवलेला आहे अशा वेळेला ज्या ठिकाणी हा रस्ता करत असताना मिळवला आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा इंडिकेशन लावलेला नाहीये त्यामुळे प्रवासी थेट स्ट्रक्चरल आदळण्याची दाट शक्यता आहे.

खड्ड्यांमुळे वाहनांचे होतेय नुकसान

महामार्गाची आताची परिस्थिती बिकट असून जीवघेणा प्रवास करावा लागतो यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांमध्ये बिघाड होतो. लोक म्हणतात ऐका सत्यनारायनाची कथा, मात्र आपल्या राज्यात बघा मुंबई - गोवा महामार्गाची कथा, एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था या मार्गाची झाली आहे. भयानक पडलेल्या खड्ड्यांमुळे सर्व वाहचालक व प्रवासी नागरिकांना प्रवास करणं अत्यंत धोकादायक असून जणू मृत्यूचा खेळखंडोबा सुरु आहे अशी वेळ येऊन ठेपली आहे.

Comments

Popular posts from this blog