नागोठणे नगरीत मच गया शोर; भव्य दहीहंडी महोत्सव 2022

शिवसेना व किशोरभाई जैन मित्र मंडळाची 31,111/- ची दहीहंडी

नागोठणे : महेंद्र माने 

नागोठणे नगरीत येथील शिवसेना शाखा व किशोरभाई जैन मित्र मंडळ आयोजित शुक्रवार 19 ऑगस्ट रोजी भव्य दहीहंडी महोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवार 19 ऑगस्ट रोजी किशोर जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा होणारा भव्य दहीहंडी महोत्सव नागोठणे विभाग मर्यादित आहे. सदरील महोत्सवाची सुरुवात दुपारी 2.00 वाजल्या पासून सुरू होणार्‍या या महोत्सवाचे खास आकर्षण पाली येथील ओम साई डान्स अकॅडमीचा मनोरंजनाचा कार्यक्रम असून या महोत्सवात भाग घेऊन यशस्वी प्रत्येक सलामी देणार्‍या गोविंदा पथकाला रुपये 2,501 /- व चषक देण्यात येणार असून दहीहंडी फोडणार्‍या पथकाला मान्यवरांच्या हस्ते रुपये 31,111/- व कै. संतोष सुदाम साळुंखे स्मृति भव्य चषक देण्यात येणार असल्याची माहिती उत्सव कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर साळुंखे यांनी दिली असून या महोत्सवात जास्तीत जास्त गोविंदा पथकांनी सहभागी होण्याचे आवाहन उत्सव कमिटीच्या वतीने अध्यक्ष ज्ञानेश्वर साळुंखे व शाखा प्रमुख धनंजय जगताप यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog