तळा येथे बेकायदा मटका-जुगार, तळा येथील पोलीस झोपा काढतात का?
तळा पोलीसांना २ लाखांचा हफ्ता?
तळा येथील मटका कायमस्वरूपी बंद करण्याची नागरिकांची मागणी
रायगड : किरण मोरे
रायगड जिल्ह्यातील तळा येथे बेकायदा मटका-जुगार राजरोसपणे सुरू असून तळा शहरात मटका राजरोसपणे सुरु असून अनेक तरुण या मटका-जुगाराच्या आहारी गेल्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्थ होण्याच्या मार्गावर आलेले आहेत.
तळा शहरात बेकायदा मटका-जुगाराचा व्यवसाय तेजीत असून येथील पोलीसांना दरमहा २ लाखांचा हफ्ता सुरू असल्यामुळे त्यांनी ह्या अवैध मटका-जुगाराला अभय दिल्याचे बोलले जात आहे. पोलीस याकडे जाणीवपूर्वक करीत करीत असल्याचे दिसत आहे. तरी या मटका व्यवसायिकांवर कडक कारवाई करून या परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवावी अशी मागणी ज्येष्ठ नागरिक व महिला वर्गाकडून केली जात आहे.