विधी सेवा पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल निलेश कासरेकर यांचा सत्कार

माणगांव : प्रतिनिधी

माणगांव तालुक्यातील गोरेगाव येथील रास्तभाव धान्यदुकानदार निलेश कासरेकर यांनी विधी सेवा पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल माणगांव पुरवठा विभागामार्फत त्याचा हृदयसत्कार करण्यात आला. त्यांनी सामाजिक काम करत असताना समाजउपयोगी कामे करत असताना रास्तभाव धन्यदुकान चालवून विधी सेवा LLB ही पदवी प्राप्त केली. त्यामुळे त्यांचा विविध स्तरातून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माणगांव पुरवठा विभागातील निरीक्षण अधिकारी संजय माने, परमेश्वर खरोडे, वंदना बागुल व अन्य कर्मचारी तसेच दुकानदार बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog