माणगांवमध्ये अवैध जुगाराचा क्लब सुरु, तातडीने कारवाई करण्याची मागणी
रायगड : समीर बामुगडे
माणगांव शहरात मुंबई-गोवा महामार्गावर अवैध जुगार क्लब सुरु झाला असून यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
सदरच्या क्लबमध्ये माणगांव तालुक्यातील अनेक शौकीन जुगार खेळण्यासाठी गर्दी करीत आहेत. मुंबई गोवा महामार्गावर एका हॉटेवच्या वर लॉजींगमध्ये हा जुगार क्लब सुरू असून अशा जुगार क्लबमुळे अनेक कुटूंब उद्ध्वस्त होत असून शासनाची कोणतीही परवानगी या क्लबला नसून बेकायदेशीरपणे व राजरोसपणे हा जुगार क्लब सुरु असून माणगांव पोलीस प्रशासनाने हा क्लब तातडीने बंद करण्याची कारवाई करावी करून कायमचा बंद करावा अशी मागणी माणगांव परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
Comments
Post a Comment