नागोठणे शहरात रविवारी हिंदू जनजागृती मंचच्या वतीने धर्म फेरीचे आयोजन

नागोठणे : महेंद्र माने

नागोठणे येथील हिंदू जनजागृती मंचच्या वतीने रविवार 07 ऑगस्ट रोजी धर्म फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

सदरील फेरी ही रविवार 07 ऑगस्ट रोजी ग्रामदैवत जोगेश्वरी मातेचे दर्शन घेऊन सकाळी 10.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सर्व हिंदू बांधव-भगिनी भगव्या टोप्या परिधान करून धर्म ध्वज फडकवित छत्रपती शिवाजी महाराज बाजार पेठ, खुमाचा नाका, के.एम.जी. कमान मार्गे गांधी चौक,जोगेश्वरी माता मंदिर, ग्रामपंचायत मार्गाने पोलिस ठाण्यात येऊन तेथील पोलीस अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आल्यानंतर सदरील धर्म फेरी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आगमन होईल. त्यानंतर फेरीमध्ये सहभागी झालेले पेणचे मोहन पार्टे, पाली येथील धनंजय गद्रे, रिलायन्स वसाहती येथील गोखले सर व इतर वक्ते सर्वांना संबोधित करणार आहेत. तरी सदरील धर्म फेरीमध्ये विभागातील जास्तीत जास्त नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याची विनंती हिंदू जन जागृती मंच, नागोठणे विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.

Popular posts from this blog