कवी प्रवीण शेळके यांच्या लेखणीतून नरेश लक्ष्मण यांच्या सुमधुर आवाजात 'गणपती आले घरा' गीतांचा नजराणा
मंजुळा म्हात्रे : प्रतिनिधी
महाराष्ट्र हे सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न असे राज्य आहे ग्रामीण भागातून आजही विविध समाजगट ही संपन्नता जोपसत आहेत. समाजाच्या विविध गटातून तयार झालेली गीते, नाचाचे प्रकार यांचा समावेश लोककलांमध्ये होतो.
अशीच कला जोपसली आहे कवी प्रवीण शेळके यांनी प्रवीण शेळके निर्मित संगीत सयोजक राज धुमाळ, सौरभ नाकते प्रस्तुत गणपती आले घरा, लागला नाचायला कोकणचा शक्ती तुरा' नॉन स्टॉप गीतांचा सदाबहार नजराणा घेऊन आले आहेत बेणसेवाडी गावचे सुपुत्र गायक नरेश नाकते व लक्ष्मण नाकते त्यांना साथ लाभली आहे गायिका सुरेखा जोशी, गायक सचिन पारंगे यांची!! विभागात आपल्या मधुर आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या, लोककला जोपसणाऱ्या या नाकते बंधुंचा सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.