विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने गणेशोत्सव साजरा करणार - अध्यक्ष दिनेश घाग
नागोठणे : महेंद्र माने
नागोठणे येथील 61 व्या वर्षात पदार्पण करणार्या के.एम.जी. विभाग गणेशोत्सव मंडळाची बैठक शनिवार 13 ऑगस्ट रोजी संपन्न झाली. त्यामध्ये मंडळाच्या अध्यक्षपदी दिनेश घाग यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यावेळी या वर्षीचा गणेशोत्सव विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने गणेशोत्सव साजरा करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष दिनेश घाग यांनी सांगितले. या नवीन कार्यकारणीत उपाध्यक्ष - उदय लाड, सचिव – रोहिदास हातनोलकर,खजिनदार - राकेश चितळकर, सहसचिव - रविंद्र वाजे, सहखजिनदार - संतोष नागोठणेकर, सल्लागार - विलास चौलकर,सुनिल लाड व मोहन नागोठणेकर तसेच कार्याध्यक्ष पदी - मनोज गायकवाड, गणेश बिरवाडकर व विकास वादळ यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. या बैठकीला के एम जी विभागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्याने नियुक्त झालेले अध्यक्ष दिनेश घाग तसेच कार्यकारणीचे नागोठणे शहरासह विभागातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.