BREAKING NEWS... BREAKING NEWS... BREAKING NEWS... BREAKING NEWS... BREAKING NEWS...
अहिल्यानगर :- थाटे, ता. शेवगाव येथे वाळू माफियांविरूध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, २ आरोपींकडून १० लाख २० हजार रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला... अमरावती शहर गुन्हे शाखेची धडक कारवाई; गाडगे नगर येथील ज्वेलर्सच्या धाडसी दरोड्यातील ७ आरोपींना ४८ तासांच्या आत ताब्यात घेऊन एकूण १ कोटी १२ लाख ३२ हजार रू. किंमतीचा मुददेमाल जप्त केला... नांदेड : शस्त्राचा धाक दाखवून मोटारसायकल चोरी, जबरी चोरी, तसेच घरफोडी करणाऱ्या टोळीला नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने अटक करून आरोपींकडून ६ गुन्ह्यांतील २ लाख १८ हजार ५०० रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
Image
कोल्हापुरात अनैतिक संबंधातून विवाहित महिलेचा खून आरोपी प्रियकर प्रवीण चिंचेवाडी गडहिंग्लज पोलीसांच्या ताब्यात! कोल्हापूर वृत्त (संभाजी पुरीगोसावी) :-   कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज तालुक्यांत भडगांव येथील सौ. सुनीता संजय केसकर (वय 40) हिचा मृत्यू वनप्राण्यांच्या हल्ल्यातून झाल्याचा बनाव अखेर गडहिंग्लज पोलिसांनी उघडकीस आणला आहे. यामध्ये आरोपी प्रियकर प्रवीण चिंचेवाडी आणि सुनीता केसकर या दोघांचे सहा वर्षापासून अनैतिक संबंध होते मात्र प्रियकरानेच तिचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी आरोपी प्रवीण चंद्रकांत चिंचेवाडी (वय 34) रा. भडगांव याला गडहिंग्लज पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने खुनाची कबुली पोलिसांना दिली आहे. सुनुता ही 18 जानेवारी आठवडी बाजारीसाठी घरांतून बाहेर पडली होती. ती बेपत्ता झाल्यानंतर 21 दिवसांनी महागांव जंगलातील झरा ओढ्यात तिचा मृतदे आढळला. सुरुवातीला वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा अंदाज होता. मात्र मृतदेहावर दागिने व मोबाईल नसणे, तसेच ती व्यक्ती जंगलात जाण्याची शक्यता कमी असल्याने पोलिसांना चांगलाच संशय आला. मात्र तपासाच्या अनुषंगाने ...

क्लॅरियंट कंपनीच्या प्रदुषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका! 

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष

रोहा : किरण मोरे

क्लॅरियंट कंपनीच्या परिसराला प्रदूषणाचे ग्रहण लागलेले असून या कंपनीच्या प्रदूषणामुळे या परिसरातील स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. ही भयानक समस्या असताना देखील प्रदूषण नियंत्रण मंडळ गप्प का आहे? येथील अधिकारी निष्क्रीय झाले आहेत का? असा प्रश्न येथील नागरिकांसमोर उभा राहिलेला आहे.

क्लॅरियंट कंपनीकडून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन व पावसाच्या पाण्याचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणात प्रदूषण सोडले जात असल्यामुळे नागरिकांचे जीवनमान धोक्यात आलेले आहे. 

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या कंपनीविरूद्ध  प्रदूषणासंदर्भात कारवाई का केली जात नाही? प्रदूषण नियंत्रण मंडळ निष्क्रीय झालेय का? असे प्रश्न येथे उपस्थित होऊ लागले आहेत. परिणामी या कंपनीच्या प्रदूषणासंदर्भात उच्चस्तरिय चौकशी होणे गरजेचे आहे.

Comments

Popular posts from this blog