धाटाव येथे DMCC कंपनीत देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

रोहा : किरण मोरे

15 ऑगस्ट 2022 देशाचा 75 वा अमृतमहोत्सवी दिन! या दिवशी संपूर्ण देशात सांस्कृतिक व देशभक्ती कार्यक्रमाचे आयोजन करून उत्साहात साजरा केला. याचा एक भाग म्हणून धाटाव MIDC मधील DMCC कंपनीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला.

यावेळी कंपनीच्या प्रांगणात झेंडा वंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सर्वप्रथम सकाळी ठीक 8.15 ला सेवानिवृत्त फौजी श्री ज्ञानेश्वर देशमुख यांना ध्वजारोहण करण्याचा मान देऊन त्यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर कंपनी चे श्री अरुण माने, राकेश खांडेकर, निलेश शेडगे यांच्या कडून देशभक्ती पर गीते गाऊन वातावरण देशभक्ती पर केले.  तसेच याप्रसंगी कंपनी चे श्री अरुण माने सेफ्टी मॅनेजर यांनी देशभक्ती भाषण दिले त्यानंतर कंपनीत वर्षभरात कामगार  कर्मचारी व त्यांच्या मुलांसाठी सेफ्टी वीक मध्ये आयोजित केलेल्या फेअर ड्रिल, निबंध, स्लोगन, चित्रकला, रांगोळी अशा विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यांचा बक्षीस समारंभ स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून स्पर्धकांना बक्षीसे देण्यात आली. तसेच इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये उत्तीर्ण विद्यार्थी व विद्यार्थीनींचा कंपनीचे श्री दीपक पाटील मेंटनेस मॅनेजर व इतर विभागातील मॅनेजर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन कंपनी चे सेफ्टी मॅनेजर श्री अरुण माने यांनी कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट श्री संभाजीराव जाधव यांच्या मागदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्सनल विभागाचे केतन पवार, अरुण दळवी, राकेश खांडेकर, अनिकेत पाटील यांनी विशेष सहकार्य केले. सर्व कामगार व कर्मचारी यांच्या उपस्थितत कंपनीत 75 वा स्वतंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

Popular posts from this blog