राष्ट्रीय जलतरण वॉटर पोलो स्पर्धेकरिता रायगड जिल्हातील सात खेळाडूंची निवड
शिहू : मंजुळा म्हात्रे
स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने होत असलेल्या ४९ व्या जलतरण व वॉटर पोलो स्पर्धेसाठी रायगड जिल्हातील झोतीरपाडा, बेणसे, शिहू विभागातील सात खेळाडूंची निवड महाराष्ट्र संघात झाली असून खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ही वॉटर पोलो स्पर्धा १६ ते २२ जुलै दरम्यान भुवनेश्वर (ओडिसा) येथे होणार आसून स्पर्धेमध्ये रिलायन्स फाउंडेशन च्या नागोठणे हेल्थ क्लब मधील जलतरण तलावाचे जळतरण पटू प्रेषिता तरे, सार्थक इंद्रे, सुजल भोय, प्रेम पाटील, रोहित कुथे, दिनांशू कुथे, आदर्श म्हात्रे या खेळाडूंचा समावेश असल्याचे प्रशिक्षक दत्ता तरे यांनी सांगितले.