जनरल मजदूर सभा ठाणे, सोल्वे स्पेशलिटी धाटाव यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण
रोहा : समीर बामुगडे
आजच्या काळात वृक्षारोपण करणे खर गरजेचे आहे म्हणून झाडे लावा झाडे जगवा, हवामानाचा समतोलता ठेवण्यासाठी झाडे लावलीच पाहिजे. जनरल मजदूर सभेचे संस्थापक अध्यक्ष कै.सूर्यकांत वढावकर यांनी युनियनच्या तर्फे खूप वर्षापासून वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरुवात करुन ठेवली आहे. सोल्वे स्पेशलिस्ट धाटाव याच्या सहकार्याने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न् झाला. यावेळी जनरल मजदूर सभेचे अध्यक्ष संज्योत वढावकर, जनरल मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी संजय वढावकर साहेब उपस्थित दिघी येथे करण्यात आले. या वेळेस जगदीश उपाध्याय, प्रशांत शेठ, सुहास खरीवले, मंगेश कदम, संजय सानप रामदास डावरे रामचंद्र साळावकर ,संजय सावंत दिघीफोर्टचे शिओ राओलसर हजर होते. वृक्षारोपण करण्यासाठी सोल्वे स्पेशलिटीचे कंपनीहेड मा.मोहित जलोटे साहेब सोल्वे स्पेशलिटीचे कंपनीचे पर्सलहेड विजय चौघुले यांचे कंपनीच्या वतीने मौलाचे सहकार्या मिळाले. या कार्यक्रमा साठी सुरज माजरेकर,संदिप दिवेकर विरेंद्र मसाल,मनोहर पाटील,विरेद्रं चिंदरकर, सत्र्येद्रं कासारे,अंनत खोपटकर, बाळकृष्ण गुनाजी, ,राजकुमार कोलथरकर ,प्रथमेश विरकुड ,नरेश मेंदाडकर उपस्थित होते.