🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

विकास निधीच्या नावाने होत असलेली लूट थांबवा! 

मनसे विद्यार्थी सेनेचा आंदोलनाचा इशारा

शिहू : मंजुळा म्हात्रे

विकास निधीच्या नावाखाली विद्यार्थी व पालकांची होणारी लूट थांबवा अन्यथा मनसे विद्यार्थी सेना आंदोलन करेल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे यांनी एस. पी. जैन कनिष्ठ महाविद्यालय नागोठणे यांना निवेदनाद्वारे दिला.

या वेळी महिला तालुका अध्यक्षा दिपश्री घासे, नागोठणे विभाग अध्यक्ष नरेश भंडारी, प्रफुल पाटील, आदेश पारंगे, मनोज पारंगे, विनीत क्षीरसागर, दीपेश वालंज, मिलिंद गोडांबे, नितेश राने, विनीत मोरे, ऋतिक खेमान, चिराग सावंत,गवराज मेस्त्री, श्रुती शेडगे, प्रियांशु चंडेल, प्राजक्ता बिरगवले इत्यादी उपस्थित होते.

या वेळी बोलताना धुळे म्हणाले की, वाढती महागाई व दैनंदिन गरजा भागाविताना सामान्य माणूस हतबल होत असताना पालकांच्या खिशात हात घालणे लाजिरवाणी गोष्ट आहे. महाविद्यालयिन प्रशासनाने याची नोंद घ्यावी अन्यथा मनसे स्टाईल ने जनआंदोलन छेडू असा इशारा साईनाथ धुळे यांनी दिला आहे. 


विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणार विकास निधी हा विद्यार्थ्यांच्या भौतिक सुखसुविधांसाठी वापरला जातो. त्याची विद्यार्थ्यांना रितसर अधिकृत पावती दिली जात आहे.

 - एम. के. पाटील 

प्राचार्य एस. पी. जैन कनिष्ठ महाविद्यालय नागोठणे

Comments

Popular posts from this blog