खासदार सुनील तटकरे साहेबांचे प्रेम हेच आमच्यासाठी आशीर्वाद - विलास चौलकर

खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव

नागोठणे : महेंद्र माने 

रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्त साधून रविवार 10 जुलै रोजी येथील राष्ट्रवादी कॉग्रेस वार्ड क्रमांक 04 च्या वतीने तसेच रा.काँ.चे पेण विधानसभा मतदार संघाचे उपाध्यक्ष विलास चौलकर यांच्या सहकार्याने सारनाथ बुद्धविहार, रमाई नगर येथे केएमजी विभागातील 10 वी,12 वी व पदवी परीक्षेमध्ये यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी खा. सुनील तटकरे साहेबांचे प्रेम हेच आमच्यासाठी आशीर्वाद असल्याचे प्रतिपादन विलास चौलकर यांनी केले.

यशस्वी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव केल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना विलास चौलकर यांनी सांगितले की, आजचा कार्यक्रम यशस्वी विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन प्रोत्साहित करण्यासाठी घेण्यात आला असून, असेच 12 वी नंतर तुम्ही विविध क्षेत्र निवडू शकता; स्वताहून अभ्यास करून प्रगति व यश संपादित करून आपले आई वडील व विभागाचे नाव उज्वल करा. त्याचप्रमाणे कोणत्याही विद्यार्थ्याला कमी लेखू नये. अपयशी विद्यार्थीही विविध क्षेत्रात पुढे जाऊन आपले नाव लौकिक मिळवीत असतात. खा.सुनील तटकरे यांचा वाढदिवस म्हणजे आम्हा कार्यकर्त्यांचा सणच असून कार्तिक एकादशीनिमित्त वारकरी सांप्रदायाला विठूरायाला भेटून जेवढा आनंद होतो तसाच आनंद व समाधान आम्हाला तटकरे साहेबांना भेटून होत असल्याचे सांगून साहेबांचे प्रेम हाच आमच्यासाठी आशीर्वाद असल्याचे शेवटी चौलकर यांनी सांगितले.चंद्रकांत गायकवाड यांनी शिक्षण हे महत्वाचे असून ते वाघीणीचे दूध आहे. 100 वर्षापूर्वी सावित्रीबाईंनी मुलींना शिक्षणाचे दार उघडे केले व आज महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे. आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण देणे गरजेचे असल्याचे सांगितले. प्रकाश मोरे यांनी शाळेत व अभ्यासात हुशार नसलेली मुलेही विविध क्षेत्रात प्रगति करीत असल्याचे सांगितले. यावेळी मनाली जोगत,रिद्धी घाग,तेजस्विनी गायकवाड व प्रवीण धाडसे या विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.  या कार्यक्रमाला रा.काँ.चे नेते भाई टके, रा.काँ ता. उपाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस आशा शिर्के, युवक जिल्हा सरचिटणीस विनायक गोळे, शहर अध्यक्ष बाळासाहेब टके, तालुका उपाध्यक्षा रिचा धात्रक, शहर अध्यक्षा सुजाता जवके, उपाध्यक्षा प्रतिभा तेरडे यांच्यासह दिनेश घाग,सुनिल लाड,प्रकाश मोरे, नंदा गायकवाड, श्वेता चौलकर,मामी शहासने, रोहिदास हातनोलकर, सखाराम ताडकर,सुदाम घाग, मंगेश तेरडे, अशोक भंडारे, मधुकर चौलकर,रविंद्र वाजे तसेच केएमजी ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाची प्रस्तावना रोहिदास हातनोलकर तर आभार दिनेश घाग यांनी केले.

Popular posts from this blog