🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

वर्षभर विविध शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रम घेणार - लायन्स क्लब अध्यक्ष डॉ. अनिल गिते

 नागोठणे : महेंद्र माने 

नागोठणे येथील लायन्स क्लबचा 28 वा शपथग्रहण सोहळा इन्स्टॉलींग ऑफीसर संजिव सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच इंडक्शन ऑफीसर नयन कवळे, रिजन 3 चे रिजन चेअरमन महेश मोघे तसेच डिस्ट्रीक्ट चेअरमन शिक्षण विभाग एमजेएफ यशवंत चित्रे यांच्या प्रमुख उपस्थिती हॉटेल इंद्रप्रस्थ येथील सभागृहात शुक्रवार 22 जुलै रोजी संपन्न झाला.यावेळी नवनिर्वाचित क्लब अध्यक्ष डॉ. अनिल गिते यांनी येत्या वर्षभरात शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रमासह विविध महत्वाचे कार्यक्रम घेणार असल्याचे सांगितले.

शिवप्रतिमेला पुष्पहार व पुजन करून उद्घाटन तसेच सुनिल कुथे यांनी लायन्स प्रतिज्ञा वाचून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर दिपक गायकवाड,नुपूर गायकवाड, शंकर चव्हाण, ऋतुजा पांचाळ, अमित मोदी, सिध्देश काळे, विमला जैन, अजित काळे, अजिंक्य कोते, दिपक लोणारी, वरद उपाध्ये, निलेश सुकाळे, सुशिल राजिवले या नवीन सदस्यांना नवीन कवळे यांनी लायन्स क्लबची संपूर्ण माहीती व त्याची कार्य प्रणालीची माहिती देवून त्या सर्वांना शपथ दिली. तसेच 2022-23 या वर्षासाठी निवडलेल्या कार्यकारणीमधील अध्यक्ष डॉ. अनिल गिते, उपाध्यक्ष लायन पांडूरंग शिंदे, सचिव एमजेएफ लायन विवेक सुभेकर तर खजिनदार लायन संतोष शहासने यांना व इतर ऑफीसर यांना शपथ देताना लायन संजीव सुर्यवंशी या सर्वांना आपले कार्य अतिशय साध्या व सोप्या भाषेत समजावुन ही कार्यकारणी अधिकृत झाल्याचे जाहीर केले. यावेळी लायन परिवारातील प्रतिक मरजे,नुपूर गायकवाड,सुजित चौलकर, ऐश्वर्य पांचाळ, निशीगंधा शिंदे, पार्थ करडे, रिद्धी शिंदे, अंतरा गायकवाड, अंजली चव्हाण, पुर्वा शहासने, क्रिश मोदी, स्वामिनी सुकाळे या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देवून अभिनंदन व सत्कार करण्यात आले. यावेळी नवीन अध्यक्ष डॉ. अनिल गिते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना येणार्‍या वर्षभरात शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रमासह विविध महत्वाचे कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने घेणार असल्याचे सांगितले. मावळते अध्यक्ष सुजित महागावकर यांनी सर्वांचे आभार मानत पुढील नवीन टिमला शुभेच्छा दिल्या. यशवंत चित्रे यांनी आपल्या विभागातील शाळांमधे विवीध कार्यक्रम व अनेक उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले. महेश मोघे यांनीही मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाला चार्टड प्रेसिडेट प्रकाश जैन, दौलत मोदी, सुधाकर जवके, विलास चौलकर, सुजाता जवके, विवेक करडे, संगीता गीते, श्वेता सुभेकर,श्वेता चौलकर, पुजा शिंदे, विशाल शिंदे,वेदांत गीते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता कुथे यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन एमजेएफ लायन विवेक सुभेकर यांनी केले.

Comments

Popular posts from this blog