राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँक नाबार्ड आणि रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने विळे येथे आर्थिक सक्षरता शिबीर संपन्न
पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर
माणगांव तालुक्यातील विळे येथे हि. म. मेथा विद्यालय व वरची वाडी विळे ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रीय कृषी विकास बँक नाबार्ड आणि रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. 8 जुलै 2022 रोजी आर्थिक साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरास महिलांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती. आज पर्यंत अनेक शिबिरे झाली. परंतु इतक्या प्रचंड प्रमाणात महिलांनी कधीच गर्दी केली नव्हती. महिलांनी केलेल्या गर्दीचे कारण विचारले असता महिलांनी सांगितले कि रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक विळे शाखेत श्री गुरव साहेब आल्या पासून त्यांनी अनेक गरीब व गरजू महिलांना कमीत कमी वेळात कर्ज मिळवून दिले आहेत. या परिसरात अनेक बचत गट आहेत या प्रत्येक बचत गटांनाही अल्पवाधित कर्ज मिळवून देण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.
या शिबिरास वरची वाडी विळे जांपंचायतीचे सरपंच परशुराम कोदे, ग्रामसेवक भारती पाटील, विळे शाखेचे शाखाधिकारी ए. ए. गुरव माणगांव शाखेचे कर्ज वसुली अधिकारी डी. एम. जाधव, सी. आर. देविका पाबेकर, वनिता शिंदे, छाया बटावले, सुवर्णा केळसकर व बचत गटाच्या महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. या शिबिरास वरील सर्व पदाधिकाऱ्यांनी उत्तम मार्ग दर्शन केले.