भाजपाने राष्ट्रपती निवडीचा आनंद लाडू व साडी वाटप करून केला साजरा

नागोठणे : महेंद्र माने 

नागोठणे येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने तसेच भाजपा शहराध्यक्ष सचिन मोदी यांच्या सहकार्याने पळस आदिवासी वाडीवर देशाच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती पदी द्रौपदी मुर्म यांची निवड झाल्याचा आनंद आदिवासीवाडीतील लहान मुलांसह नागरिकांना लाडू तसेच महिलांना साडीचे वाटप करून साजरा करण्यात आला.

सचिन मोदी यांच्या सहकार्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्त साधून शुक्रवार 22 जुलै रोजी देशाच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती पदी द्रौपदी मुर्म यांची निवड झाल्याचा आनंद पळस आदिवासी वाडीवरील लहान मुलांसह सर्व नागरिकांना नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांचा फोटो दाखवून एक आदिवासी महिला देशाच्या उच्च पदावर विराजमान झाल्याचे सांगीतले. तसेच राष्ट्रपतींचे कार्य व द्रौपदी मुर्म यांच्या बाबतची सर्व माहिती समजावून सांगून सर्वांना मान्यवरांच्या हस्ते लाडूचे तसेच महिलांना साडीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपा उपजिल्हाध्यक्ष मारुती देवरे,भाजपा महिला जिल्हा उपाध्यक्षा श्रेया कुंटे, तालुका सरचिटणीस आनंद लाड, शिक्षण सेल तालुका अध्यक्ष अशोक अहीरे, शहर अध्यक्ष सचिन मोदी, तीरथ पोलसानी, ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्यासह तालुका महिला उपाध्यक्षा अपर्णा सुटे, सोशन मीडिया सयोजिका प्रियांका पिंपळे, विभागीय अध्यक्ष मनोज शिर्के तसेच भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog