भिरा परिसरात जून अखेर फक्त 308.60 मि. मि. पाऊस, गत वर्षी 1007.60 मि.मि. पावसाची नोंद झाली होती
पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर
माणगाव तालुक्यातील भिरा परिसरात दर वर्षी सर्वात जास्त पावसाची नोंद होत असतेपरंतु यावर्षी मात्र जून महिना संपला तरी फक्त 308.60मि. मि. इतकीच पावसाची नोंद झाली आहे.म्हणजे गत वर्षीच्या तुलनेत 699मि. मि. इतका कमी पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांची पेरणीची कामे पूर्ण झाली असून लावणी साठी आता पावसाचा जोर वाढला तरच शेतात पाण्याचा साठा होईल व शेतकऱ्यांना लावणीची कामे सुरू करता येतील. भिरा टाटा पॉवर हाऊसला पाणी पुरवठा करणाऱ्या मुळशी धरणातील पाणी साठा कमी झाला असून पुरेसा पाऊस न झाल्यास कंपनीला तर याचा फरक पडेलच परंतु यामुळे कुंडलिका नदीचे पाणी सुध्दा आटू शकते. असे जर झालेच तर ज्या कुंडलिका नदीतूनच्या पाण्यावर कोलाड रोहा इंडस्ट्री चालते तेथील कारखान्यावर याचा थेट परिणाम होऊ शकतो. त्यासाठी इथून पुढे तरी धुवाँधार पाऊस पडणे फार आवश्यक आहे.