शालेय साहित्य वाटप व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न
पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर
रायगड जिल्हा परिषद शाळा पाटणूस येथे लोकनेते, रायगड दक्षिण लोकसभा मतदार संघांचे लोकसभा सदस्य सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पाटणूस पंचक्रोशीतील दानशूर व्यक्तीमत्व विजय महादेव राणे (म्हसेवाडी) यांच्या वतीने जि.प.शाळा पाटणूस येथील विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना,आपण ज्या समाजात राहतो, वाढतो, घडतो व वावरत असतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागत असतो,आणि याच सामाजिक बांधिलकीतून मी दरवर्षी शालेय विद्यार्थी तसेच इतर सामाजिक उपक्रमांसाठी माझ्या उत्पन्नातील काही भाग खर्च करत असतो. विद्यार्थी हे देशाच भवितव्य आहे आणि त्यांच्या शिक्षणासाठी आपण सर्वांनी मिळून त्यांना शिक्षणासाठी मदत करणे आवश्यक आहे असे मत यावेळी विजय राणे यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे कौतुक करण्यासाठी व प्रेरणा देण्यासाठी सन 2021-22 या शैक्षणिक वर्षांत राज्यस्तरीय ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थी ईश्वरी खटके,धैर्या बंडगर, हर्ष सालेकर, आर्यन मरगळे, श्रवण काटकर यांचा सत्कार करण्यात आला. या सर्व विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्ते प्रविण सावंत यांचेकडून 2100 रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी अधिकाधिक अभ्यास करून स्पर्धा परीक्षांमध्ये सुयश प्राप्त करावे यासाठी ग्रामपंचायतचे कायमस्वरुपी सहकार्य राहील असे आश्वासन पाटणूस ग्रामपंचायत सरपंच सौ. निलीमाताई निगडे यांनी दिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाटणूस जि.प.शाळेचे मुख्याध्यापक श्री.राठोड सर तर सूत्रसंचालन श्री.खटके सर यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरेश चाळके, जयदीप म्हामुणकर, पत्रकार आरती म्हामुणकर, मोराळे सर, धोंडू मरगळे, सुमेक जाधव, जान्हवी म्हामुणकर, प्राजक्ता भिलारे, सालेकर आजी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी, जो इतरांसाठी देतो,त्याला परमेश्वरही भरभरून देत असतो अशी भावना व्यक्त करून बंडगर सरांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले.