रोह्यात खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पाककला स्पर्धा संपन्न, सखी मंच चा स्तुत्य उपक्रम
आ. अदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन
पाककला स्पर्धेत अक्षता राजेंद्र शिंदे प्रथम
रोहा : प्रतिनिधी
रोह्यात खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रोह्यातील सखी मंचने या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन रोहा अष्टमी ज्येष्ठ नागरिक सभागृहात केले होते. उपवास म्हटले की आपणाला साबुदाणा खिचडी, वडे असे नेहमीचे पदार्थ आपल्यासमोर येतात. मात्र रोह्यातील पाककला स्पर्धेत महिलांनी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनविल्याने परीक्षण करणाऱ्याचे कस लागला होता.परिक्षणा दरम्याण सखी मंचच्या पदाधिकारी व उपस्थित स्पर्धकांनी विठू माऊलीचा जयघोष केला. यावेळी रायगड जिल्हा माजी पालकमंत्री आ.अदिती तटकरे यांच्या हस्ते पाककला स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा प्रीतम पाटील, शहर अध्यक्षा प्राजक्ता साळवी, शहर अध्यक्ष अमित उकडे, शहर अध्यक्षा सखी मंचाच्या अध्यक्षा स्नेहा अंबरे, माजी नगरसेविका शिल्पा धोत्रे, ज्योती तेंडुलकर, विद्या घोडींदे, श्रद्धा कोर्लेकर, मुक्ता राक्षे, राखी पाटील, ज्योती पवार, सुविधा वाकडे, माधवी मोरे, रेखा खटावकर, जयश्री धनावडे, हेतल देवकर, सुवर्णा देसाई, प्रियांका कांबळे आदी उपस्थित होत्या.
खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहा अंबरे यांच्या सखी मंच तर्फे आयोजित पाककला स्पर्धेत ४० स्पर्धकांनी आषाढी एकादशी असल्याने वेगवेगळ्या प्रकारचे उपवासाचे पदार्थ बनविले होते. रोह्यातील महिलांनी पाककला स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवून विविध प्रकारच्या पाककृती सादर केल्या होत्या. पाककला स्पर्धेमुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांक अक्षता राजेंद्र शिंदे, द्वितीय क्रमांक मनीषा तोडकर, तृतीय क्रमांक विभावरी जोशी, उत्तेजनार्थ चंपादेवी कुमावत यांनी विजेतेपद पटकावले. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम सन्मान चिन्ह व भेटवस्तू देऊन सखी मंच तर्फे गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू देण्यात आल्या. स्पर्धेचे परीक्षण मानसी चाफेकर, नीलिमा जोशी व शीतल दंडागव्हाळ यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विद्या घोडींदे यांनी केले.