87 लाखांची नळ पाणीपुरवठा योजना मंजुर; किशोर जैन यांच्या विशेष प्रयत्नांना यश
नागोठणे : महेंद्र माने
रोहा तालुक्यातील ऐनघर ग्रामपंचायत हद्दीतील तामसोली, सावरट व घोघरकरवाडी या गावांसाठी नळ पाणीपुरवठा योजनेसाठी शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा मा. जि.प. सदस्य किशोर जैन यांनी केलेल्या विशेष प्रयत्नाला यश आले असून या योजनेसाठी 87 लाख निधी मंजूर करण्यात आली आहे.
किशोर जैन यांच्या विशेष प्रयत्नाने रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जल जीवन मिशन योजने अंतर्गत तामसोली, सावरट व घोघरकरवाडी या गावांसाठी नळ पाणीपुरवठा योजना मंजुर करण्यात आली असून सदरील योजनेसाठी 87 लाख रुपयांचा भरीव निधी उपलब्ध झाला आहे. या कामाला मंजुरी मिळाल्याची प्रत शुक्रवार 15 जून रोजी किशोर जैन यांच्या हस्ते ग्रामस्थांना देण्यात आली. यावेळी किशोर जैन यांनी सदरील काम चांगल्या दर्जाचे व लवकरात लवकर पूर्ण होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. सदरील योजनेचे मंजूरी प्रत देते वेळी ऐनघर ग्रा.पं.सदस्य प्रकाश डोबळे,उमाजी चव्हाण,तानाजी शिरसे, अशोक डोबले,मंगेश शिंदे,नितीन शिरसे,पांडुरंग कनघरे, वामन कनघरे, नारायण घोघरकर, काळूराम घोघरकर, रोहिदास घोघरकर,मनिष कदम, नारायण कदम,जनार्दन कदम, संतोष कदम आदी ग्रामस्थ उपस्थित होते.