बहुजन समाजासाठी पंचायत समिती निवडणूक लढणार – संतोष गायकवाड

नागोठणे : महेंद्र माने

नागोठणे येथील आरपीआय रोहा तालुकाध्यक्ष, बहुजन विद्यार्थी संघटना रायगड जिल्हाध्यक्ष तसेच माथाडी कामगार संघटना रोहा तालुकाध्यक्ष संतोष गायकवाड यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्त्य साधून सामाजिक कार्याची आवड असल्याने तसेच कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर बहुजन समाजासाठी पंचायत समिती निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले.

संतोष गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात संतोष गायकवाड यांनी मला सामाजिक कार्यांची आवड असल्याने अनेक वेळा शासकीय कार्यालयात जात असतो यामध्ये बहुजन समाजातील नागरिक, कामगार व विद्यार्थ्यांचे कामे करताना अनेक अडचणी येत असतात त्या सोडवित असताना लोकनेत्याची उणीव सतत भासत असते. त्यामुळे आताच आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या आग्रहानुसार मी बहुजन समाजासाठी आरपीआय पक्ष किंवा कोणत्याही पक्षातून उमेदवारी मिळाली तर ठीकच आहे; नाहीतर अपक्ष म्हणून पंचायत समिती निवडणूक निश्चितच लढणार असल्याचे शेवटी गायकवाड यांनी जाहीर केले. यावेळी बौद्धजन पंचायत शाखा क्र. 3 चे उपाध्यक्ष प्रभाकर ओव्हाळ यांनी संतोष गायकवाड यांच्या सामाजिक कार्याची माहिती देऊन आपण गोरगरीब बहुजन समाजातील लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी अगामी होत असलेल्या पंचायत समिती निवडणूक नागोठणे विभाग क्र. 77 मधून लढविण्याची सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने विनंती करून आम्ही सर्व सहकार्य करणार असल्याचे शेवटी सांगितले. यावेळी व्ही.के.जाधव, भगवान बिनेदार, सुनील देवरे, अक्षता बिनेदार यांनी आपल्या मनोगतात तसेच कार्यकर्ते व सर्वच मान्यवरांनी सहमती दर्शविली. या कार्यक्रमाला व्ही.के.जाधव, विलास चौलकर, सिराज पानसरे, सुनील देवरे, किसान शिर्के, दिनेश घाग, अशोक भंडारे, सुनील लाड, दीपक दाभाडे, प्रशिक बिनेदार, विनायक तेलंगे, नरेश भंडारी, दीपक सोनावणे यांच्यासह विभागातील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Popular posts from this blog