नदी किनाऱ्यावरील नागरिकांनी सतर्क राहावे
पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांचे आवाहन
नागोठणे : महेंद्र माने
नागोठणे परिसरातील नदी किनारी व्यवसाय व राहणार्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन नागोठणे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांनी केले.
याबाबत अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांनी सांगितले की, या वर्षी प्रमाणापेक्षा जास्त पाऊस असून गेली बरेच दिवस अहोरात्र पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. काही वेळेला जास्त पाऊस झाल्याने नदीला पुर येतो व पाणी वेगात वाढते; अशा वेळी नागोठणे शहर व परिसरातील नदी किनारील व इतर नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे असून, नदी किनारी कामे करीत असताना शक्यतो दिवसभरात करावी, पाणी वाढत असल्याचे समजताच इतरांना सावध करून लगेच पाण्या बाहेर पडावे, प्रशासनाच्या सूचनेचे पालन करावे, एकादा प्रसंग आल्यास लगेच पोलिस किंवा संबधित व्यक्तींकडे संपर्क साधावा जेणे करून अनर्थ घडणार आहे असे सांगून, पुर आलेल्या ठिकाणी पाण्यात जाण्याचा प्रयत्न करू नये,तरुणांनी उगाच स्टंटबाजी करू नये जेणे करून आपला व इतरांचा जीव धोक्यात येईल तसेच परिसरात धबधबे मोठ्या प्रमाणात आहेत त्या ठिकाणी शक्यतो जाऊ नये गेलात तर आपली व आपल्या बरोबर असलेल्यांची काळजी घ्या त्याच प्रमाणे डोंगर दर्यांतून वाहन चालविताना दरड, झाडे कोसळण्याचा संभव असल्याने सावधपणे वाहन चालवावे असे सांगून,काहीही,कधीही व कुठेही प्रसंग आल्यास पोलिसांकडे संपर्क साधण्याचे आवाहन शेवटी श्री. नारनवर यांनी केले.