नागोठणे पत्रकार संघाने घेतली पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांची सदिच्छा भेट 

विविध प्रश्नांवर केली चर्चा

नागोठणे : महेंद्र माने 

नागोठणे येथील पोलीस ठाण्यात नव्याने नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांची नागोठणे पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी पोलीस ठाण्यात भेट घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा केली.

येथील पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांची वडखळ येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी बाळा कुंभार यांची नियुक्ती करण्यात आली. ते पोलिस ठाण्यात रुजू होताच त्यांची नागोठणे पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर झालेल्या चर्चेत शहरातिल विविध भागात तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात नेहमीत होणारी वाहतूक कोंडी, ट्रिपल सीट व धूम स्टाईल मोटरसायकल स्वार,रात्रीची गस्त यासह अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी अध्यक्ष उदय भिसे, सचिव महेंद्र माने, खजिनदार पुरुषोत्तम घाग यांच्यासह नारायण म्हात्रे, निलेश म्हात्रे व मिलिंद घाग हे उपस्थित होते.

Popular posts from this blog