पावसाचा जोर कायम; अंबा नदीने धोक्याची पातळी ओलाडली, नागोठणेत पुर

एसटी स्थानकात पाणी, वाहतूक महामार्गावरून वळवली, प्रवाशांचे हाल; व्यापारी चिंतेत

नागोठणे : महेंद्र माने 

नागोठणे येथील अंबा नदीने मंगळवार 12 जुलै रोजी सायंकाळी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसाचा जोर कायम असून पुराचे पाणी शहरातील काही भागात शिरले. पुरामुळे शहरात मुख्य ठिकाणे येणारे तिन्ही रस्ते बंद झाल्याने तसेच एसटी स्थानकात पाणी असल्याने एसटी वाहतूक महामार्गावरून वळविण्यात आली आहे. नदी किनारील छोटे छोटे दुकानदारांची धाव पळ होऊन ताळांबळ उडाली आहे.                     

गेले काही दिवस सतत पडणारा पावसाबरोबरच रविवार सोमवार रोजी दिवस रात्र शहरासह डोंगर माथ्यावर पडलेल्या मुसळधार पावसाचे पाणी अंबा नदीत वाढल्याने मंगळवार 12 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली व पुराचे पाणी संथगतीने एस.टी.स्थानक, विभागीय शिवसेना शाखेच्या मागे,मरिआई मंदिर समोरील परिसर, मटण मार्केटची मागील बाजू, हॉटेल लॅकव्हयू व सरकारी विश्राम गृहाच्या समोरील रस्त्यावर तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक या भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. त्यामुळे एस.टी.स्थानकाशेजारील व शिवाजी चौकातील छोटे छोटे टपरीमधील व इतर दुकानदारांनी आपल्या दुकांनातील सामान सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरुवात केली.तसेच नागोठणे शहरात येणारे तिन्ही ठिकाणचे मुख्य रस्ते बंद झाल्याने तसेच एस.टी.स्थानकात पाणी असल्याने एसटी वाहतूकीसह इतर वाहतूक महामार्गावरून वळवल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तात्पुरत्या स्वरूपास बस थांबा देण्यात आला. एसटी बसने कामानिमित्त प्रवास करणारे प्रवाशी स्थानकात तसेच महामार्गाकडे जाणार्‍या रस्त्यावर पाणी असल्याने महामार्गाकडे जाण्यासाठी जोगेश्वरी मंदिर,बाळासाहेब ठाकरे नगर मार्गे पावसात जावे लागल्याने प्रवाशांचे हाल झाले असून त्रासाला सामोरे जावे मागत आहे.. पुराचे पाणी वाढले तर आपल्या दुकानात पाणी शिरेल या चिंतेत येथील छत्रपती शिवाजी महाराज बाजार पेठेतील व्यापारी असून पावसाचा जोर कायम राहिला तर पुराचे पाणी निश्चित वाढणार असल्याचे मत जाणकार व्यक्तींनी व्यक्त केले आहे.

Popular posts from this blog