दक्षिण रायगड जिल्‍ह्यातील आगामी निवडणुका शिवसेनेने स्‍वबळावर जिंकण्यासाठी शिवसैनिक, युवासैनिकांची ताकद निर्माण करणार! - युवासेना जिल्‍हा युवा अधिकारी विपुल उभारे

माणगांव : प्रमोद जाधव

शिवसेना नेते, माजी मंत्री सुभाष देसाई, माजी केंद्रीय मंत्री खास. अनंत गीते, जिल्‍हा संपर्कप्रमुख सदानंद थरवळ, जिल्‍हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या माध्यमातून युवासेना जिल्‍हा युवाअधिकारी, दक्षिण रायगड पदी काम करण्याची संधी मिळाली असून पक्ष संघटनेने टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रयत्‍न करणार आहे असे विपुल उभारे यांनी १० जुलै रोजी त्यांच्या माणगांव कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते  आदित्‍य ठाकरे यांच्या नेतृत्‍वाखाली शिवसेना-युवासेनेची सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, रोजगार, क्रीडा, आरोग्‍य क्षेत्रांतील कार्य, ध्येय, धोरणे याबाबतची माहिती युवकांपर्यंत पोहचवून त्‍यांना युवासेनेमध्ये कार्यरत होण्यासाठी प्रोत्‍साहन देणार आहे. अनेक युवक युवासेनेच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय क्षेत्रांत पदार्पण करण्यास इच्छुक असून त्‍या सर्वांना सोबत घेऊन सर्वसामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे, महिलांचे, युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच द. रायगड जिल्‍ह्यातील 7 तालुक्‍यामंध्ये 'युवासेना हेल्‍पलाईन' सुरु करणार असल्याचे देखील विपुल उभारे यांनी सांगितले.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यंमत्री असताना कुटुंबप्रमुख म्‍हणून महाराष्‍ट्र राज्‍यातील जनतेशी जोडलेले प्रेमाचे नाते, त्‍याची जनमाणसांतील प्रतिमा, लोकप्रियता यामुळे आगामी काळात "ठाकरे ब्रँड" हाच प्रभावी ठरणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांच्या न्यायहक्‍कांसाठी स्‍थापन केलेल्‍या शिवसेनेचे हिंदुत्‍ववादी विचार हे शिवसैनिकांच्या, जनतेच्या नसानसांत भिनलेले आहेत. त्‍यामुळे भाजप ने कुटील डाव टाकून शिवसेना संपविण्याचा केलेला प्रयत्‍न महाराष्‍ट्रातील जनता हाणून पाडणार असून पक्षप्रमुख श्री. उध्दवसाहेब ठाकरे यांच्या मागे ठाम राहणार आहे असे देखील मत विपुल उभारे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

शिवसेनेतील बंडखोरीमुळे निर्माण राजकीय परिस्‍थीती ही सामान्य शिवसैनिकांसाठी संकट नसून मोठी संधी आहे. शिवसेनेत गेली अनेक वर्षे निष्‍ठेने काम करणा-या शिवसैनिकांना शिवसेनेच्या महत्‍वांच्या पदांवर काम करण्याची संधी आहे. तसेच आगामी स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था निवडणुकीत शिवसेनेकडून तिकिट मिळणा-या उमेदवाराला जिल्‍ह्यातील, तालुक्‍यातील जनता साथ देणार आहे, हे सद्याचे चित्र आहे.रायगड जिल्‍ह्यातील आगामी येण-या स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था निवडणुका जिंकण्यासाठी तमाम शिवसैनिक, युवासैनिकांची ताकद निर्माण करणार आहेत तसेच राहतील, राजकीय वैचारीक मतभेद झाल्‍यामुळे मी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्‍वाखाली शिवसेना-युवासेना संघटना वाढीसाठी प्रयत्‍न करणार असल्‍याचे देखिल युवासेना दक्षिण रायगड प्रमुख विपुल उभारे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

शिवसेनेचे बंडखोर आमदार  भरत गोगावले यांचे कट्‌टर समर्थक अशी आपली ओळख असून आपण शिवसेनेसोबत राहण्याचा निर्णय घेतल्‍याबद्‌दल सर्वत्र आश्चर्य व्यक्‍त केले जात आहे असे विपुल उभारे यांना विचारले असता त्‍यांनी पक्षात झालेल्‍या बंडखोरीमुळे संघर्षाच्या काळात आपण शिवसेनेसोबतच राहायला पाहिजे, असा निर्णय घेतल्‍याचे त्‍यांनी सांगितले. आमदार भरत गोगावले यांच्याशी कोणताही वैयक्‍तिक रोष नसून जे पुर्वीपासूनचे ऋणानुबंध आहेत तसेच राहतील, राजकीय वैचारीक मतभेद झाल्‍यामुळे मी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्‍वाखाली शिवसेना-युवासेना संघटना वाढीसाठी प्रयत्‍न करणार असल्‍याचे सांगितले.

Popular posts from this blog