खासदार धैर्यशील माने आणि संजय मंडलिक शिंदे गटात सामिल, घराबाहेर सशस्त्र पोलीस बंदोबस्त!

कोल्हापूर : सुकूमार भोसले

कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार धैर्यशील माने आणि संजय मंडलिक हे शिंदे गटात सामिल झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजचा सूर उमटत असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात न घेतल्याने अथवा कोणतीही मिटींग न घेताच हा निर्णय घेतल्याने कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने त्यांच्या घरासमोर सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

दोन्ही खासदारांना शिवसेनेकडून सन्मानाची वागणूक मिळूनही त्यांनी बंडखोरी का केली? असा सवाल शिवसैनिकांकडून केला जात असून याप्रकरणी संतप्त प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत. कार्यकर्त्यांचा उद्रेक होण्याची चिन्हे दिसू लागल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता खासदार धैर्यशील माने आणि खासदार संजय मंडलिक या दोघांच्याही घराबाहेर सशस्त्र पोसीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog