एव्हरेस्ट शिखर सर करणारी कोल्हापूरची पहिली रणरागिणी कु. कस्तुरी सावेकर हिचा सत्कार
श्री साई मंदिर मंगळवार पेठ वर्धापन दिन सोहळा संपन्न
कोल्हापूर : सुकूमार भोसले
श्री साई मंदिर मंगळवार पेठ यांच्या स्थापनेला २९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वर्धापन दिन सोहळा येथे संपन्न झाला. त्याचबरोबर एव्हरेस्ट शिखर सर करणारी कोल्हापूरची पहिली रणरागिणी कु. कस्तुरी दीपक सावेकर हिचा सत्कार समारंभ संपन्न झाला. हा सत्कार जायंन्ट्स ग्रुप ऑफ कोल्हापूर पर्ल च्या वतीने करण्यात आला.
यावेळी कु. कस्तुरी हिला कोल्हापूर पर्ल ग्रुपच्या वतीने ट्रॉफी, शाल, श्रीफळ, गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच या यशाबद्दल तिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कु. कस्तुरी दीपक सावेकर हिला जायन्ट्स ग्रुप ऑफ कोल्हापूर पर्ल ग्रुप ची "सन्माननीय सदस्या" म्हणून ग्रुप मध्ये सामावून घेण्यात आले आणि नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी स्पेशल ऑफिसर सौ. मंदाकिनी साखरे-मोरे, प्रकाश मोरे सर, डायरेक्टर श्री सुरेश खांडेकर, मार्गेश पाटील, आकाश रांगोळे आणि सुकूमार भोसले यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.