आ. रविशेठ पाटील यांना दिली अनोखी गुरु दक्षिणा
नागोठणे : महेंद्र माने
नागोठणे येथील भाजपा शहराध्यक्ष सचिन मोदी यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त बुधवार 13 जुलै रोजी पेण येथील वैकुंठ निवासस्थानी जाऊन आ. रविशेठ पाटील यांचे आशीर्वाद घेऊन अनोखी गुरुदक्षणा दिली.
सचिन मोदी यांनी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मारुती देवरे व भाजपा कार्यकर्ते यांच्या समवेत आ.रविशेठ पाटील यांची गुरुपौर्णिमे निमित्त भेट घेतली व त्यांना पुष्पहार, पुष्पगुच्छ, शाल,श्रीफळ देत सन्मान करीत गुरुदक्षिणा म्हणून खास मुंबईहून मागविलेले सतत मधुमेह तपासणी यंत्र व सेन्सर भेट देत त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली व सदरील मशीन वापराबाबतचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्या कौशल्याकाकू पाटील व जिल्हा परिषद माजी विरोधी पक्षनेते तसेच भाजपा रायगड उपजिल्हाध्यक्ष वैकुंठ पाटील यांचीही भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ,शाल, श्रीफळ व भेट वस्तु देऊन सन्मान केला. यावेळी नागोठणे शहराध्यक्ष सचिन मोदी, रोहा तालुका महिला उपाध्यक्ष अर्पणा सुटे, उपाध्यक्ष गौतम जैन, मीना मोकल यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.