माणगांव विभागाच्या लाईट ऑफ लाईट ट्रस्ट कडून शैक्षणिक साहित्य वाटप
साई/माणगांव : हरेश मोरे
माणगांव तालुक्यातील लाईट ऑफ लाईट ट्रस्ट कडून 24 जून आणि 25 जून 2022 रोजी माणगाव विभागातील 232 विद्यार्थ्यांसाठी केंद्रनिहाय शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. लोकमान्य ज्ञानदीप विद्यामंदिर साई, नूतन खरवली विद्यामंदिर तसेच नवजीवन विद्यामंदिर तळाशेत येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रकल्प व्यवस्थापक अविनाश पाटील, माणगांव उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविण पाटील, माणगांव पंचायत समितीचे माजी सभापती सुजित शिंदे, साई केंद्रप्रमुख खैरे, साई पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष गजानन अधिकारी,सचिव गणेश पवार, मुख्याध्यपिका सुजाता पाटील, इंदापूर हायस्कुल गावडे शालिनी वाढवल उपस्थित होते.
या कार्यक्रमाचा उद्देश केवळ साहित्य वाटप नव्हता एवढा नव्हता तर या कार्यक्रमातून विद्यार्थी व पालकांना भेटून त्यांना ट्रस्ट च्या ध्येय धोरणाची जाणीव करून देणे व त्यांच्यात उत्साह निर्माण करणे हा प्रमुख उद्देश ट्रस्टचा आहे.