शिहू येथे डॉक्टर दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न
शिहू : मंजुळा म्हात्रे
रोहा तालुका मेडिकल चॅरिटेबल असोसिएशन व रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१ जुलै रोजी डॉक्टर्स डे चे औचित्य साधून डॉ. भोईर यांच्या निवासस्थानी शिहू येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला उत्तम प्रतिसाद लाभला या वेळी ५० बाटल्या रक्त संकलित करण्यात आल्या.
मानवी जीवनात अपघात किंवा गंभीर आजा्रांमध्ये योग्य वेळी रुग्णाला रक्त मिळाले नाही तर रुग्ण दगावण्याची शक्यता असते अशा वेळी एका मानवाचे रक्त दुसऱ्या मानवाचे प्राण वाचवू शकते त्या मुळे रक्तदानाला अनन्यसाधारण महत्व असल्याचे जाणून शिहू विभागातील तरुणांनसह महिलांनीही सहभाग दर्शवून सामाजिक बांधिलकी जपली.
यावेळी डॉक्टर्स असोसिएशनचे डॉ. रोहिदास शेळके,डॉ. राजेंद्र धात्रक, डॉ. सुनील पाटील, डॉ. पुरुषोत्तम भोईर,रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रसाद भोईर, कामगार नेते लक्ष्मण खाडे, अजिंक्य पाटील,मा. सभापती संजय भोईर,पेण विधानसभा संघटिका दर्शना जवके,विशाल दिवेकर,मा. सरपंच नरेश पाटील, प्रणाली पाटील,के. के कुथे,विजय पाटील,दामोदर भोईर, इत्यादिंसहअलिबाग रकतपेढीच्या डॉ. सारिका बिडये, डॉ. दिक्षा तोडणकर, सुनील बंदिछोडे, पूनम पाटील, आकाश सावंत, उमेश पाटील, अमोल साळवी,उपस्थित होते.