राष्ट्रवादी महिला अध्यक्ष दमखाडी विभाग मेघना नागावकर यांच्याकडून खासदार सुनीलजी तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दमखाडी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय पॅड व खाऊ वाटप
चंद्रशेखर सावंत : प्रतिनिधी
राष्ट्रवादी महिला अध्यक्ष दमखाडी विभाग मेघना महेश नागावकर यांच्याकडून रायगड जिल्ह्याचे खासदार सुनीलजी तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संत गोरोबा नगर शाळा दमखाडी या शाळेत विद्यार्थ्यांना शालेय पॅड व खाऊ वाटण्यात आला तसेच शाळेसाठी साईनाथ बचत गट महिला अध्यक्षा नीता महेश कोल्हटकर यांनी झाडे लावण्यासाठी कुंड्या तसेच माजी शिक्षिका पालवणकर मॅडम यांनी झाडे लावण्यासाठी कुंड्या शाळेला भेट दिल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपनगराध्यक्ष महेश गोपीनाथ कोल्हटकर, माजी नगरसेविका गीता ताई नरेश पडवळ, ह.भ.प. शेळके महाराज, दमखाडी गावचे अध्यक्ष मनोहर धाटावकर, समाधान शिंदे, महेश नागावकर, राकेश पवार, अशोक धाटावकर, दत्तात्रेय घोलपकर पांडुरंग हाशीलकर, विलास पालवणकर, दत्ता धाटावकर, सुनील धाटावकर राजू धाटावकर, विश्वनाथ आंबेकर, आनंदी गृह उद्योग अध्यक्षा नूतन राकेश नलावडे, अर्चना समाधान शिंदे, हर्षदा अरुण माने, वर्षा धाटावकर तसेच शाळेतील शिक्षिका सायली पडवळ हे उपस्थित होते पाहुण्यांचे स्वागत शाळेच्या शिक्षिका सायली पडवळ यांनी केलं प्रमुख पाहुण्यांच्या हातून विद्यार्थ्यांना शालेय पॅड वाटप करण्यात आले. तसेच खाऊ वाटप करण्यात आला. त्याबरोबर माजी नगराध्यक्ष महेश नागावकर यांनी आपल्या छोटेखानी भाषणामध्ये शाळेची झालेली प्रगतीही सांगितली.