स्थलांतरित चांदेपट्टी वासीयांना सचिन मोदी यांची मायेची ऊब
नागोठणे : महेंद्र माने
नागोठणे येथील भाजपा शहर अध्यक्ष सचिन मोदी यांनी पेण तालुक्यातील स्थलांतरित चांदेपट्टी वासीयांना मायेची ऊब म्हणून ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.
पेण तालुक्यातील अतिशय दुर्गम तसेच डोंगर दरीच्या कुशीत वसलेल्या चांदेपट्टी गावाला दर वर्षी पावसाळ्यात दरड व भूस्खलनाची भीती असते. त्यामुळे पावसाळ्यात येथील नागरिकांना आपल्या गावातून तात्पुरता स्थलांतरित करून त्यांची सोय पेण येथील पेण तालुका मराठा समाज सभागृहात स्थलांतरित करण्यात आले आहे. या स्थलांतरित चांदेपट्टी वासीयांची भाजपाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील व नागोठणे भाजपा अध्यक्षा सचिन मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांनी भेट घेऊन त्यांच्या समस्या समजावून घेतल्या. यांच्या पुढाकाराने पेण तालुका भारतीय जनता पार्टी तसेच नागोठणे शहर भाजपा तर्फे मदतीचा हात देण्यात आला असून सदर नागरिकांना सचिन मोदी यांच्या सहकार्याने वैकुंठ पाटील व सचिन मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा रा. जि. महिला उपाध्यक्षा श्रेया कुंटे, नागोठणे उपाध्यक्ष गौतम जैन, रोहा तालुका महिला मोर्चा उपाध्यक्षा नीलिमा राजे, नागोठणे विभाग महिला मोर्चा सरचिटणीस मुग्धा गडकरी आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते .
चांदेपट्टी गावाची भौगोलिक परिस्थिती पाहता या गावाला कायमस्वरूपी भूस्खलनाची भीती आहे. या गावाच्या पुनर्वसनसाठी शासकीय जागा अनेक ठिकाणी उपलब्ध आहेत. या गावाच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करून शासन दरबारी चांदेपट्टी ग्रामस्थांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी प्रयत्न करणार आहोत.
- वैकुंठ पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष