लहानग्यांसोबत सोबत साजरा केला वाढदिवस
शिहू : मंजुळा म्हात्रे
कुहिरे येथील शिवसेनेच्या पेण विधानसभा संघटिका दर्शना जवके यांनी आपला वाढदिवस येथिल कुहिरे आदिवासीवाडी शाळेतील लहान मुलांसोबत केक कापून व खाऊ वाटप करून साजरा केला. यावेळी लहानग्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद पाहायला मिळाला.
राजकीय क्षेत्रात एक उत्तम संघटक असणाऱ्या दर्शना जवके या नेहमी सामाजिक उपक्रम रबावत असतात. एके काळी अंगणवाडी शिक्षिका असणाऱ्या जवके यांनी लहान मुलांसोबत वाढदिवस साजरा करून आपल्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी शाळेतील शिक्षक व शिवसेना कुहीरे शाखेच्या हेमांगी बंगाल, शालिनी शिगवण, मनीषा जवके, प्रभा जवके, उपस्थित होत्या.