रोहा वनविभागाच्या वतीने वनमहोत्सव अंतर्गत बिजा रोपण कार्यक्रम संपन्न

रोहा : समीर बामुगडे

रोहा वनविभागाच्या वतीने दि. १ जुलै ते ७ जुलै या कालावधीत वनमहोत्सव कार्यक्रम सुरू असून त्यानिमित्ताने वनसंरक्षणार्थ विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये बिजा रोपण कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. 

उप वनसंरक्षक रोहा श्री. अप्पासाहेब निकत, सहाय्यक वनसंरक्षक रोहा श्री. विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. मनोज वाघमारे  वन परिक्षेत्र अधिकारी रोहा व अ‍ॅड. हेमंत गांगल यांच्यासह इतर सामाजिक संस्था तसेच निसर्गप्रेमी यांच्या वतीने ३ जुलै २०२२ रोजी वन विभाग रोहा मधील वन परिक्षेत्र रोहा येथे वन महोत्सवानिमित्त बिजा रोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तरी कार्यक्रमाला उपस्थित लायन्स क्लब,सेंट्रल रोटरी क्लब, सी.डी.देशमुख महाविद्यालय, मेहेंदळे हायस्कूल, सृष्टी फाऊंडेशन, रोहा अष्टमी नगरपालिका, ब्राह्मण मंडळ रोहा, वन परिक्षेत्र अधिकारी रोहा व कर्मचारी वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने बिजा रोपण कार्यक्रम पार पाडण्यात आला.

Popular posts from this blog