भिरा उन्नई धरणात राफ्टींग, बोटिंग व फेरी व्यवसाय सुरू करण्याचा धनदांडग्यांचा घाट, ग्रामस्थांचा विरोध

पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर

पाटणूस पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पाटणूस ग्रामपंचायत कार्यालय व पाटणूस भिरा देवकुंड समिती यांना कोणत्याही प्रकारे माहिती न देता कार्य करी अभियंता रायगड पाटबंधारे विभाग कोलाड यांनी परस्पर भिरा उन्नई भिरा धरणामध्ये बोटिंग, राफ्टिंग व फेरी संबंधी निविदा काढून परप्रांती्यांना कंत्राट दिल्याने पाटणूस पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. 

माणगांव तालुक्यातील उन्नई भिरा धरणात पाटबंधारे विभागाच्या परवानगी शिवाय बोटिंग करण्यास सक्त मनाई आहे. शिवाय त्या परिसरात अनोळखी व्यक्तींना फिरण्यास सक्त मनाई आहे. असे असताना गुरुवार दि. 28 जुलै 2022 रोजी एक बोट उन्नई धरणात फिरताना ग्रामस्थांनी पाहिली. चौकशी अंती असे समजले कि कार्यकारी अभियंता रायगड पाटबंधारे विभाग कोलाड यांनी परस्पर भिरा धरणामध्ये बोटिंग, राफ्टिंग व फेरी व्यवसाय करिता निविदा काढून पाटणूस पंच क्रोशितील ग्रामस्थ, ग्रामपंचायत कार्यालय पाटणूस व पाटणूस भिरा देवकुंड समिती यांना अंधारात ठेऊन एका परप्रांतीय नागरिकाला कंत्राट दिले. 

भिरा उन्नई धरणात बोटिंग व्यवसाय सुरू झाल्यास अनेक समस्या निर्माण होणार आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे या धरणातून पाटणूस पंचक्रोशीतील म्हसेवाडी, गोळेवाडी, विठ्ठल नगर, बहिरीवाडी व विळे ग्रामपंचायत हद्दीतील धनगर वाडीला पाणी पुरवठा केला जातो. धरणातून चालणाऱ्या या सर्व बोटी इंधनावर चालणाऱ्या असल्याने पाणी दूषित होण्याची दाट शक्यता आहे, बोटी सुरू झाल्यानंतर गाईडला कोणतेही काम उरणार नाही. जंगलाच्या वाटेने जाताना गाईडची गरज लागते त्यामुळे आज तेथे शेकडो गाईड काम करतात त्यामुळे त्यांना रोजगार मिळतो. जंगलाच्या वाटेने जाताना पर्यटकांना थोडे श्रम पडतात पण त्यांना अवघ्या 100 रुपयात देवाकुंडाला जाता येते शिवाय निसर्गाचा आनंद घेत मनासारखी फोटोग्राफी करता येते. या उलट बोटीने प्रवास केला तर प्रत्येक पर्यटका मागे 1500 रु. मोजावे लागू शकतात, बोटिंगचा शेड बांधल्यानंतर पर्यटक थेट बोटिंच्या ठिकाणी जातील त्याचा विठ्ठल नगर, बहिरीवाडी व पाटणूस मधील महिलांच्या स्वयं रोजगारावर याचा थेट परिणाम होईल, बोटींगच्या ठिकाणी व आजूबाजूच्या परिसरात काही धनदांडगे पंचतारांकित हॉटेल व रिसॉर्ट बांधण्याच्या तयारीत आहेत त्यांच्याकडे पर्यटक आकर्षित होतील. पाटणूस पंचक्रोशीत काही ग्रामस्थांनी लाखो रुपये खर्च करून पर्यटकांची राहण्याची सोय केली आहे. त्यातून त्यांना थोडा फार फायदा होतो, त्याचे नुकसान होणार आहे. एकंदरीत सर्व बाबींचा विचार केल्यास धरणातून बोट चालवून देणे ग्रामस्थांच्या हिताचे नाही. यामुळे या बोटिंग व्यवसायला कडाडून विरोध करायचा असे ग्रामस्थांनी निश्चित केले आहे. पाटणूस येथे शुक्रवार दि. 29 जुलै 2022रोजी झालेल्या पाटणूस पंचक्रोशीतील गावकीमधे हा निर्णय घेण्यात आला.

Popular posts from this blog