चिमुकल्या विद्यार्थ्यांना पुराचा फटका; शाळेने घेतली पूर्ण काळजी

नागोठणे : महेंद्र माने

नागोठणे येथील अंबा नदीने मंगळवार 12 जुलै रोजी सायंकाळी जोरदार पावसात धोक्याची पातळी ओलांडली होती. तसेच पालीतील पूलावरूनही पाणी जात असल्याने तोही रस्ता बंद झाल्याने पालीतील विद्यार्थी होली एन्जल इंग्लिश स्कूलमध्ये अडकले.त्या मुलांची शाळेची योग्य प्रकारे काळजी घेतली व प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थी घरी पोहचेपर्यंत मुख्याध्यापक विजय मुल्कवाड सर्व स्टाफ शाळेत थांबला होता.

सायंकाळी पुराचे पाणी शहरासह आजूबाजूच्या परिसरातील काही भागात शिरले व वाढू लागल्याने येथील नदी कीनार्‍यापासून जवळच असलेल्या होली एन्जल इंग्लिश स्कूलमधील मुख्याध्यापक विजय मुल्कवाड व शिक्षकांनी 5.30 वाजता सुटणारी शाळा लवकर 4.00 वाजता सोडण्याचा निर्णय घेतला व त्याची कल्पना प्रत्येक पालकांना दिली. परंतु पाली पुलावर पाणी असल्याने पालीतील चिमूकली विद्यार्थी शाळेत अडकले.त्या सर्व विद्यार्थ्यांची शाळा कमिटीने सर्वोतरी काळजी घेऊन त्यांना खाऊ व नास्त्याची व्यवस्था केले.मुले अडकल्याची माहिती पालीत राहणार्‍या व रोहा येथील प्रेरणा मतिमंद मुलांच्या शाळेतील शिक्षिका श्रीया जोशी यांना समजताच त्यांनी रोहा वरुन पालीला जात असता होली एन्जल शाळेत जाऊन मुलांना धीर दिला व त्यांच्या सोबत राहिल्या. इकडे पालीमधील मुलांच्या काळजीत पडलेल्या काही पालकांनी आपल्या चार/पाच वाहने घेऊन पाली रवाळजे, कोलाड मार्गे शाळेत आले. व सर्व विद्यार्थ्यांना रात्री 8.30 च्या दरम्यान पालीमध्ये सुरक्षित आणले. या दरम्यान प्रत्येक विद्यार्थी घरी पोहचेपर्यंत मुख्याध्यापक विजय मुल्कवाड सर्व स्टाफ शाळेत थांबला होता.   

Popular posts from this blog