चांदोरे ग्रामपंचायत येथे महापंचायत राज अभियान
साई/माणगांव : हरेश मोरे
चांदोरे ग्रामपंचायत येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त पंचायत समिती माणगांव व ग्रामपंचायत चांदोरे यांच्या संयुक्त विद्यमाने महापंचायत राज अभियान चांदोरे ग्रामपंचायत कार्यालयात राबविण्यात आले.
या अभियान कार्यक्रमासाठी माणगांव पंचायत समितीचे माजी सभापती सुजित शिंदे, गटविकास अधिकारी वाय. एम. प्रभे, विस्तार अधिकारी विनोद मिंडे, चांदोरे सरपंच दीप्ती चांदोरकर, उपसरपंच सूर्यकांत चांदोरकर, ग्रामसेवक मंगेश चांदोरकर, रामभाऊ चिमण, दत्तात्रय पाते, ग्रामपंचायत सदस्य मेघा सावंत, वामन चाचले तसेच अंगणवाडी सेविका, कृषी सहाय्यक व मदतनीस यांची उपस्थिती होती.
या अभियानात वारस नोंदणी करणे, पती /पत्नी यांची संयुक्तपणे घरांना नाव लावणे, सन 2011 पूर्वीची अतिक्रमण नियमानकुल करणे, ई-श्रम कार्ड काढणे, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन नोंद करणे, जन धन योजना खाते उघडणे, प्रधानमंत्री उज्वला योजना, जॉब कार्ड काढणे, आयुष्यमान भारत योजना तसेच आधार कार्ड कॅम्प राबविणे. याबाबत उपस्थित ग्रामस्थांना माहिती देण्यात आली.