विहूर गावामध्ये नियम डावलून दिला वृक्षतोड परवाना!
वन क्षेत्रपाल, वनपाल, वनसंरक्षक यांच्या विरोधात मुख्य वनसंरक्षकांकडे तक्रार
रोहा : समीर बामुगडे
मुरूड तालुक्यातील विहूर गावामध्ये नियम डावलून दिला वृक्षतोड परवाना! वन क्षेत्रपाल, वनपाल, वनसंरक्षक यांच्या विरोधात मुख्य वनसंरक्षक ठाणे यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुरूड तालुक्यातील विहूर गावामध्ये श्री नथू माने यांना दि. 27 मे रोजी 108 खैर झांडाची तोड परवानगी देण्यात आलेली आहे. संबधीत वृक्षतोड परवाना हा केवळ 8 दिवसांचा दिला पाहीजे होता, तरीही सर्व नियम पायदळी तुडवून हा वृक्षतोड परवाना 30 दिवसांचा देण्यात आला आहे. संबधीत वृक्षतोड परवाना हा ज्या वन क्षेत्रपाल श्री. पाटील यांनी दिला आहे त्यांची बदली झालेली आहे. त्यामुळे कोणते हितसंबंध ठेवून त्यांनी चुकीचा वृक्षतोड परवाना दिला याची चौकशी करणे गरजेचे आहे. सामान्य शेतकरी जेव्हा स्वतःच्या घरकामासाठी काही किरकोळ वृक्षतोड करतो त्यावेळी हेच वन अधिकारी त्या शेतकऱ्यावर कारवाई करण्यासाठी उतावळे झालेले असतात. पण आज विहूर गावामध्ये 5 जून नंतर 35 सेक्शन चे उल्लंघन केले जात आहे. त्याची कोणतीही कार्यवाही होत नाही उलट वनपाल व वनरक्षक संबंधित तोडलेल्या मालाची थप्पी चेक करायला जातात तरी महोदय संबधीत आपल्या सर्व अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून संबंधित माल जप्त करावा ही नम्र विनती.
संबंधित विहूर गावा मधील खैरतोड ही शासन निर्यणायाच्या विरोधात आहे. संबंधित तयार मालाचा पंचनामा आता कसा होवू शकतो? संबधीत विहूर गावामध्ये संबंधित मालकीच्या चहू बाजूला 35 सेक्शन लागू आहे, 35 सेक्शन लागू असताना देखील येथे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झालेली आहे. तरी संबंधितत माल हा प्रथम दर्शनी जप्त करण्याची कारवाई करण्याबाबत मुख्य वनसंरक्षक ठाणे यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.