किशोर जैन यांची शिवसेना सहसंपर्कप्रमुख पदी नेमणूक
नागोठण्यात शिवसैनिकांनी पेढे वाटून केला आनंद साजरा
नागोठणे : महेंद्र माने
नागोठणे येथील शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार तथा मा. जि.प. सदस्य किशोर जैन यांची शिवसेना पेण,अलिबाग विधानसभा सहसंपर्कप्रमुख पदी नेमणूक करण्यात आली आहे. नेमणुकीचे वृत्त येताच रविवार 26 जून रोजी येथील शिवसेना विभागीय शाखेत पेण विधानसभा संघटिका दर्शना जवके,उपविभागप्रमुख बळीराम बडे,शाखाप्रमुख धनंजय जगताप, मा. शाखाप्रमुख कीर्तीकुमार कळस व शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत किशोर जैन यांचा भगवी शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच शिवसैनिक – युवासैनिकांनी पेढे वाटून आपला आनंद साजरा केला.यावेळी मोहन नागोठणेकर,ज्ञानेश्वर साळुंखे,लक्ष्मण खाडे,बाळू रटाटे, अनिल महाडीक,विजय धामणे,शैलेश रावकर,दीप्ती दुर्गावले,मंजुळा शिर्के,राजीव टेमकर,इम्रान पानसरे, मजीद लंबाते,सुदेश येरुणकर,प्रकाश मेस्त्री, हुसेन पठाण,शेखर जोगत,जीवन पत्की,मंदार कोतवाल,महेंद्र नागोठणेकर,गौरव नागोठणेकर,अल्विन नाकते,पंकज कामथे यांच्यासह विभागातील शेकडो शिवसैनिक-युवा सैनिक उपस्थित होते.