विळे विभागात "सर्व सेवा केंद्राचे" आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते उद्घाटन
पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर
माणगांव तालुक्यातील विळे विभागात ग्रामीण नागरिकांना नागरी सेवा, विविध शासकीय योजना यांच्या सेवा मिळण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सर्व सेवा केंद्राचे उद्घाटन महाड पोलादपूर, माणगांव चे कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते झाले. या सर्व केंद्राच्या माध्यमातून विळे विभागातील नागरिकांना इन्शुरन्स, फूड लायसन्स, विविध बिल पेमेंट,ऑनलाईन मेडिसिन खरेदी, शासनाचे विविध दाखले या सेवा मिळणार मिळणार आहेत.
अल्पेश उतेकर व भावेश साखळे संचालन करण्यात या सर्व सेवा केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी आमदार भरत गोगावले यांच्या समवेत जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, रायगड जिल्हा महाई सेवा केंद्राचे प्रमुख विद्यानंद अधिकारी, शिवसेना विभाग प्रमुख मनोज सावंत,शिवसेना अवजड वाहतूक सेना तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर उतेकर, उपतालुका प्रमुख नितीन पवार, विळे सरपंच परशुराम कोदे, भागाड सरपंच प्रकाश जंगम, संजय गूळम्बे, युवा उद्योजक राजेश कदम,संतोष पोळेकर,जतीन महाडीक,अविनाश नलावडे,विनायक करावडे, डॉ. नितीन मोदी आदी उपस्थित होते.
माणगाव तालुक्यातील विळे विभाग हा तालुक्यातील शेवटचे टोक म्हणजे (कोंडेथर) गावापर्यन्त माणगाव तालुक्याचा विस्तार आहे.व पुणे जिल्हा सीमा लागुनच येते.विळे भागाड औद्योगिक क्षेत्र असले तरी शासकीय कामांकरिता ह्या विभागातील नागरिकांना तालुक्याचे ठिकाण २५ ते ३५ किमी येथेच जावे लागते. विळे विभागात नव्याने झालेल्या सुरू झालेल्या सर्व सेवा केंद्रामुळे विभागातील सर्वसामान्य नागरिकांची विविध दाखले, शासकीय योजनांची अर्ज भरणे प्रकिया यांसारख्या गोष्टी गावातच होणार असल्याने प्रवास खर्च व उडणारी त्रेधातिरपीट थांबणार आहे.