पाटणूस भिरा, विळे परिसरात मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस

पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर

माणगाव तालुक्यातील पाटणूस भिरा, विळे परिसर व आजूबाजूच्या परिसरात मेघ गर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.7 जून व 8जूनपासून तूरळक स्वरूपात पावसाने सुरुवात केली दिवसभर पाऊस आणि सायंकाळी तूरळक पाऊस यामुळे वातावरणात कमालीचा उष्मा जाणवत होता. मात्र 9जून रोजी पावसाने मेघगर्जनेसह जोरदार हजेरी लावली. क्षणात होत्याचे नव्हते झाले. पावसासोबत विजांचा ही लपंडाव सुरू होता. पावसाचा जोर इतका होता की काही क्षणात गटारे तुडुंब वाहू लागली. हवामान खात्याने 13 तारखेपर्यंत पाऊस लांबल्याचे भाकीत केल्यानेघरांची डागडुजी करण्याची उसंत मिळाल्याने नागरिक बिनधास्त होते मात्र अचानक पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.

Popular posts from this blog